कोण म्हणतय दुनिया सारी गोल आहे
या दुनिये मधे प्रतेकाचे मोल आहे
ही दुनिया साली ओपिनियन पोल आहे
या दुनिये मधे सगळी कड़े झोल आहे
दगड़ा मधल्या देवा साठी थांबतो बारा तास
माणुसकीच्या गळ्या भोवती आवळतो हा फास
देवासाठी देतो लाखो करोड़
गरिबाच्या पाठीवर ओढ़तो असूड
आठरा वर्षे संभाळुन द्यावा लगतो हुंडा
जवाई जरी असेल भला मोठा धोंडा
तरी देखील सुनेला सासरचा छळ
माहेराला सासरचा कायमचा बोल
चोरांच्या हाता मधे आहे मलीदा
कष्टकऱ्यांना आहे खाण्याचा वांदा
दलालांच्या हाता मधे आहे कारभार
शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर